राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील मतदार 20 नोव्हेंबर रोजी आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सज्ज झाले आहेत. राज्यात महायुती आणि विरोधी महाविकास आघाडी (एमव्हीए) आघाडी यांच्यात सरळ लढत पाहायला मिळत आहे.
मतदान केंद्रावर स्वीकारलेल्या कागदपत्रांची यादी पुढीलप्रमाणे :-
1) – पासपोर्ट
2) -वाहन चालविण्याचा परवाना
3) -छायाचित्रांसह सेवा ओळखपत्रे (कर्मचाऱ्यांना केंद्र/राज्य सरकार/पीएसयू/पब्लिक लिमिटेड कंपन्यांद्वारे जारी केलेले)
4) -अधिकृत ओळखपत्रे (खासदार/आमदार/एमएलसी यांना जारी केलेले)
5) -छायाचित्रासह पासबुक (बँक/पोस्ट ऑफिसद्वारे जारी)
6) -पॅन कार्ड
7) -स्मार्ट कार्ड (NPR अंतर्गत RGI द्वारे जारी केलेले)
8) -मनरेगा जॉब कार्ड
9) -हेल्थ इन्शुरन्स स्मार्ट कार्ड (कामगार मंत्रालयाच्या योजनेअंतर्गत जारी केलेले)
10) -युनिक डिसाबीयुनिक डिसेबिलिटी आयडी (यूडीआयडी) कार्ड (सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण
मंत्रालयाने जारी केलेले,
11) -छायाचित्रासह भारत सरकारचे पेन्शन दस्तऐवज
12) -आधार कार्ड